◾हातावर पोट असणाऱ्यांनी आज जगायचं कसं ? खायचं काय ? सर्वसामान्यांना प्रश्न..
◾राज्य सरकारने जाहीर केलेली मदत आजतगायत काही पोहोचलेली नाहीय ; त्यामुळे राज्य सरकारनं यावर तोडगा काढावा ; सुधीर राऊळ
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि-२९ :- राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याची सुचक वक्तव्य मंत्र्यांकडून केली जात आहे. कोरोनाच्या संकंटात आधीच सर्वसामान्य माणूस, व्यापारी, रोजंदार कामगार भरडले गेलेत. त्यात वीज बिल, बँकांच्या कर्जाचे हप्ते याबाबत राज्य सरकार कोणत्याही प्रकारची वाच्चता करत नाही आहे. हातावर पोट असणाऱ्यांची आज जगायचं कसं ? खायचं काय ? हेच प्रश्न पडले आहेत. उद्योजक, व्यावसायिकांवर आर्थिक संकट आलीय. त्यात राज्य सरकारने जाहीर केलेली मदत आजतागायत काही पोहोचलेली नाहीय. त्यामुळे राज्य सरकारनं यावर तोडगा काढावा अशी मागणी मनसेचे सुधीर राऊळ यांनी केली आहे.

