◾जगद्गुरु मंहमद पैगंबर यांच्या बद्दल अभद्र भाष्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या यती नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करा..
◾वैभववाडी तालुका मुस्लिम समाज व ग्रामस्थ यांनी दिले तहसीलदार रामदास झळके यांना निवेदन..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-२९ :- जगद्गुरु मंहमद पैगंबर यांच्या बद्दल अभद्र भाष्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या यती नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करा. या मागणीचे निवेदन वैभववाडी तालुका मुस्लिम समाज व ग्रामस्थ यांनी तहसीलदार रामदास झळके यांना दिले आहे. नरसिंहानंद यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास लवकरच निषेध मोर्चा काढणार असल्याचा इशारा मुस्लिम समाज नेते एस.एम.बोबडे यांनी निवेदनातून दिला आहे.
नरसिहानंद यांनी असे आक्षेपार्ह विधान करून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी नरसिंहानंद यांना असे अभद्र बोलण्याची खोड आहे. राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल हि त्याने अभद्र विधान केले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या घालणा-यांचे त्यांनी समर्थन केले होते. दरम्यान त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याने, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची पुन्हा पुन्हा असे बोलण्याची हिम्मत वाढत आहे.स्त्री जातीला सन्मानाने जगण्याची ज्यांनी शिकवण दिली. ज्यांनी आपल्या अनुनयाने गुंडांचा नाश केला, ज्यांनी सर्वप्रथम समानतेचा पुरस्कार केला. जाती-पातीच्या दऱ्या दूर केल्या. लिंगभेद नाकारले. श्रीमंत-गरीब यामधील दरी कमी केली. शांततेचा संदेश दिला. अशा मंहमद पैगंबर यांच्यावरील अभद्र वक्तव्य मुस्लीम समाज कदापिही सहन करणार नाही.
संपूर्ण देश आज कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. देशाला राष्ट्रीय ऐक्याची व ऐक्य भावनेची गरज आहे. असे असताना नरसिंहानंद यांच्या अभद्र बोलण्याने देशात यादवी निर्माण होऊ शकते असे निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू असल्याने आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करत हे निवेदन देत आहोत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास १४४ कलम उठताच शांततेच्या मार्गाने गावोगावी सर्व मुस्लिम बांधव निषेध मोर्चा काढतील. तसेच तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. दरम्यान शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार शासन व प्रशासन राहील असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी मुस्लिम समाज नेते एस. एम. बोबडे, उमर रमदुल, हुसेन लांजेकर, बाबालाल लांजेकर, हामीद लांजेकर, अकबर बक्कर, अस्लम पाटणकर, शहाबुद्दिन नाचरे, रफिक बोबडे, अकबर बोबडे, कादिर नाचरे, मज्जिद नंदकर व मुस्लीम बांधव उपस्थित होते.

