आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीशासकीयसिंधुदुर्ग

◾वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले मास्क चे वाटप..

 

🖥️ Kokan Live Braking News

 ✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-२९ :- वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क चे वाटप केले. मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मास्क उपलब्ध करून दिले आहेत. तहसीलदार यांनी मास्कची मागणी नितेश राणे यांच्याकडे केली होती.

तहसीलमधील महसूल विभाग, पुरवठा विभाग, निवडणूक शाखा व संजय गांधी विभाग या ठिकाणी स्वतः जाऊन तहसीलदार झळके यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क वाटप केले. जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी अशा सूचना श्री झळके यांनी यावेळी दिल्या. शासकीय कामासाठी सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!