◾सलून चालक व कारागीर आर्थिक संकटात..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,दि-२९ :- कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे समाजातील सर्व घटकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व सेवा बंद असल्याने शहरी व ग्रामीण भागातील सलून चालकांच्या व्यवसाय ठप्प झाला असून सलून चालक-मालक व कारागीर आर्थिक संकटात सापडले आहेत .
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व सलून बंद आहेत. अशा परिस्थितीत सलूनमधील कारागीर चालक-मालक संकटात सापडले आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात अनेकांचे या धंद्यावर हातावर पोट आहे. सलून चालकांना कारागिरांच्या पगारासह दुकानाचे भाडे, विज बिल, व्यवसाय कर ,ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका कर यांचे विविध कर यांच्यासह विविध खर्च देणी भागून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो . मात्र संचारबंदी मुळे सर्व व्यवसायिक आपापली सलून बंद करून घरी असल्याने सलून व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले आहे.

