आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾कोरोनामुळे ऐन हंगामात मंगल कार्यालये रिकामी..

 

◾वाजंत्री मंडप डेकोरेटर्सना काम नाही..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,दि-२७ :- गतवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोरोना चा संसर्ग कायम आहे. किंबहुना तो दुप्पट वाढला आहे. त्यामुळे लग्न सराई ,यात्रा ,उत्सव, राष्ट्रीय कार्यक्रम, व इतर समारंभात नेहमीसारखे साजरे करण्यास प्रशासनाने मनाई केली. आहे . तर मे महिन्यात पंधरा दिवसांचे मुहूर्त लग्नाचे आहेत. राज्य सरकारकडून लग्न समारंभ फक्त एकाचा हॉलमध्ये दोन तासांमध्ये पूर्ण करावे लागतील यासाठी एकूण 25 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. असे नियम केल्यामुळे समारंभाच्या संख्येत खूपच घट झाली आहे. त्यामुळे मंडप डेकोरेटर, फुल व्यवसायिक, आचारी ,वाजंत्री, व इतर व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत .गतवर्षी 22 मार्च पासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जारी केले होते. तब्बल आठ महिन्यानंतर लॉकडाऊन हळूहळू शिथील करण्यात आल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. पण पुन्हा एकदा मार्च महिन्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले .खरेतर या कालावधीत लग्न समारंभ व इतर विविध कार्यक्रम होत असतात .परंतु कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत .यामुळे लग्न समारंभात उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे सर्व साहित्य डेकोरेटर्सना गुंडाळून ठेवावे लागले आहे .मागील वर्षी सुद्धा कोरोनामुळे त्या व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले होते . डिसेंबर नंतर सर्व काही सुरळीत होईल या आशेवर या व्यवसायिकांनी पुन्हा उभारी घेत तयारी केली होती. नवीन मंडपाचे कापड विविध आकर्षक सेट इलेक्ट्रॉनिक साहित्य आदी वस्तूंची खरेदी करून ठेवली. होती तर काही कार्यक्रमाच्या ऑर्डरही घेतल्या होत्या . लग्न व इतर समारंभासाठी विविध प्रकारच्या शोभिवंत फुलांची सजावटीसाठी मोठी मागणी असते तर लग्न घरी हार, फुले, गजरे ,वेण्या, तोरणे यांची मोठी मागणी असते पण कोरोनामुळे व्यवसाय बंद झाला असल्याने व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे गावागावात शुभमंगल कार्य हे वाजंत्रेशिवाय पूर्ण होत नाहीत . परंतु त्यांची कार्यक्रमास शासनाने बंदी घातल्याने व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे .आता शेवटच्या टप्प्यात काहीतरी व्यवसाय होईल पण ती शक्यता सुद्धा धूसर असल्याचे व्यावसायिकांकडून बोलले जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!