◾राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांनी दिली वेंगुर्ले येथील डॉ. आंबेडकर वसतिगृह कोविड सेंटरला भेट..
◾रुग्णांशी प्रत्यक्ष भेटुन जाणुन घेतल्या समस्या..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग,दि-२७ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून दर दिवशी सरासरी पंधरा वीस लोक मृत्यूमुखी पडत असुन जिल्हा प्रशासनतर्फे कोविड कोरोना चाचण्या तपासणी जलदगतीने होणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने चाचण्या उशिरा होत आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांमुळे संसर्ग अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी खंत यांनी व्यक्त केली.
वेंगुर्ले येथील डॉ. आंबेडकर वसतिगृहा कोरोना कोविड सेंटर येथे केलेल्या भेटी प्रसंगी ते बोलत होते. कोविड केअर सेंटर येथील रुग्ण व्यवस्था, भोजन, व्यवस्था,औषधोपचार, कर्मचारी वर्ग याबाबत सविस्तर चर्चा करून त्यांनी रुग्णांशी प्रत्यक्ष भेटुन सविस्तर पणे समस्या जाणुन घेतल्या.
यावेळी कोरोना कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल दुधगावकर, डॉ.अनघा बांद्रे, औषध प्रक्रिया अधिकारी महेश चव्हाण, कुडाळ राष्ट्रवादी सेल तालुकाध्यक्ष डॉ.संदिप पाटील उपस्थित होते.

