◾लसीकरणापासून वंचित राहू शकणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करण्यासंदर्भात नगरसेवक अँड परिमल नाईक यांची उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पाटील यांच्याशी चर्चा..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-२७ -: कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हेच एक प्रभावी माध्यम असल्याचे जगाने मान्य केले असून, सर्व वयोगटातील नागरिकांना एकाचवेळी लसीकरण करतेवेळी ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजाराने त्रस्त असणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू शकतात किंवा त्यांना लसीकरण करण्यास विलंब होऊ शकतो त्यामुळे अशा नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करण्यासंदर्भात नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी आज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पाटील यांच्याशी संपर्क करून याबाबत चर्चा केली.
असता त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच यावेळी गरज लागल्यास आपण नगरपालिकेचे कर्मचारी उपलब्ध करून देवू असा विश्वास मुख्याधिकारी यांनी देखील नगरसेवक अँड परिमल नाईक यांना दिला आहे.

