सरकारी कामगार कार्यालयात एजंटगिरी बोकाळली आहे-संतोष भैरवकर
*सावंतवाडी दि.२७-:* महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत असंघटित कामगारांसाठी विविध मंडळाच्या माध्यमातून असंख्य कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत सदर योजनांच्या माध्यमातून कामगारांचे जीवनमान उंचावणे व त्यांना ही प्रमुख उद्दिष्टे आहेत मात्र अलीकडील काळात सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात एजंटगिरी बोकाळल्या असून जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग यांनी यासंदर्भात वेळीच दखल घेऊन उचित कार्यवाही करावी अन्यथा मनसे येत्या काळात यासंबंधी आक्रमक पवित्रा घेणार असून तीव्र आंदोलन करेल असा इशारा प्रसिद्ध पत्रकद्वारे मनसे परिवहन कामगार संघटना जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर यांनी दिला आहे.

