आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾अनिल भिसे मित्रमंडळाच्या वतीने कोविड कालावधीत कार्यरत असलेल्या बांदा शहरातील आरोग्य, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि-२६ :- येथील अनिल भिसे मित्रमंडळाच्या वतीने कोविड कालावधीत कार्यरत असलेल्या बांदा शहरातील आरोग्य, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले.

यापूर्वी सावंतवाडी शहरात हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर आज बांदा शहरात राबविण्यात आला. सुरुवातीला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व आरोग्य कर्मचाऱ्यांना पाणी वाटप करण्यात आले. त्यानंतर बांदा-गोवा सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पाणी वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी ब्रायन डिसोजा, बेंजामिन फर्नाडिस, अनिल भिसे, पत्रकार संघाचे सचिव प्रसन्न राणे, बाळा हरमलकर, रत्नाकर माळी, श्री मेस्त्री, जतीन भिसे, अरुण भिसे, पत्रकार निलेश मोरजकर, संजय भाईप, प्रवीण परब, राकेश परब, शैलेश गवस, मंगल कामत, राजेश गोवेकर आदी उपस्थित होते. अनिल भिसे मित्रमंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!