◾खेर्डी थ्रीएम पेपर मिल ठरू शकतो कोरोना हॉस्पॉट ; कामगारांची कोरोना टेस्ट करा ; राजू जाधव
◾जिल्हाधिकारी ,सभापती ,आरोग्य विभागाकडे राजू जाधव व महेश कदम यांनी केली मागणी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२६ :- चिपळूण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना ने सर्वत्र हाहाकार माजविला आहे,त्यातच मोठं मोठे कारखानदार कामगारांचे जीव धोक्यात घालून आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत,खेर्डी एमआयडीसी मधील सतत चर्चेत असणाऱ्या थ्रीएम पेपर मिल मध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर काम करीत आहेत . हे कामगार बाजारपेठेतही राजरोसपणे वावरतात प्रशासनाने तबतोब या कंपनीतील सर्व कामगार ,अधिकारी, व्यवस्थापन मधील सर्व मंडळींची कोरोना टेस्ट करावी अशी मागणी युवक काँग्रेस चे चिपळूण तालुका क्षेत्राध्यक्ष महेश कदम,आरपीआय चे माजी तालुका अध्यक्ष राजुशेठ जाधव यांनी केली आहे,
चिपळूण आरपीआय चे माजी तालुका अध्यक्ष राजुशेठ जाधव,युवक काँग्रेसचे क्षेत्राध्यक्ष महेश कदम,युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले,शहर अध्यक्ष फैसल पिलपिले यांनी सोमवारी चिपळूण पंचायत समिती सभापती रियाताई कांबळे उपसभापती पांडुरंग माळी यांची भेट घेतली आणि खेर्डी एमआयडीसी मधील थ्रीएम पेपर मिल मधील सेवेत असलेल्या सर्वांचीच शासनातर्फे कोरोना टेस्ट करावी अशी मागणी केली,
*कोविड कंट्रोल रूम ला भेट*
चिपळूण तालुक्यातील आरोग्य विभागाने सुरू केलेल्या covid 19 या कॅट्रोल रूम ला युवक काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली कंट्रोल रूम मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी यांचे चिपळूण पंचायत समिती सभापती सौ रिया कांबळे यांनी कोतुक केले कंट्रोल रूम मधील कर्मचारी अतिशय उत्तम मार्गदर्शन रुग्णच्या नातेवाईकांना करत आहेत यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राअध्यक्ष महेश कदम आर पी आय चे नेते राजू भाई जाधव माजी उपसभापती पांडुरंग माळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले आदी उपस्थित होते.

