◾वनविभाग विश्नामगृहासमोरील झाड बनलंय जीर्ण ; पावसाळ्यापुर्वी तोडण्याची होतेय ग्रामस्थांमधून मागणी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ,दि-२६:- वेंगुर्ले बेळगांव मार्गावर आकेरी येथे वनविभागाचे विश्नामगृहासमोरील वनविभागाच्या परिसरात असलेले भलेमोठे झाड अपघातास कारणीभूत ठरु शकते.हे झाड बरेच जूने असून पुर्ण जीर्ण झाले असून धोकादायक बनले आहे पावसाळ्यात मोठा वारापाऊस झाल्यास हे झाड कोसळण्याची दाट शक्यता आहे तसेच ह्या झाडाजवळच वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहीन्या असून पावसात हे झाड कोसळल्यास विजेच्या खांबासह वीज वाहीन्यासुद्धा तुटून पडणार आहे अशी परिस्थिती त्या झाडाची आहे.
वनविभागाने पुढे होणारे धोके लक्षात घेऊन ते झाड तोडावे अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.वनविभागाने ह्यावर त्वरित लक्ष घालावे जेणेकरुन पावसात कोणतेही संकट उभे राहणार नाही ह्याचा विचार करावा पावसात झाड कोसळल्यास स्थानिकांना तसेच त्या मार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांना पण ह्याचा त्रास सहन करावा लागेल म्हणूनच वनविभागाने हे झाड पावसाळ्यापुर्वी तोडून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

