◾चिपळूण शहरात होणार पालिकेचे कोविड सेंटर..
◼️नागरिकांना मोठा दिलासा ; नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांचे प्रयत्न यशस्वी
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२६ :- आज सोमवार दिनांक २६ एप्रिल रोजी , चिपळूण नगरपरिषदेची तातडीची विशेष सभा पार पडली. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता , शहरामध्ये कोविड सेंटर उभे करण्याच्या विषयावर आज सभेत चर्चा करण्यात आली.
नगराध्यक्षांच्या ५८/२ या विशेष अधिकारातून शहरामध्ये कोविड सेंटर उभ करण्याचा निर्णय आज नगराध्यक्षा सौ. सुरेखा नितीन खेराडे यांनी घेतला. या निर्णयाला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी सर्वानुमते मंजूरी दिली.
कोविड सेंटर अंतर्गत अँब्युलन्स , ऑक्सिजन जनरेटर तसेच प्राथमिक सोयीसुविधांसाठी लागणारे साहित्य आदी घेण्यात येईल. कोविड चा प्रादुर्भाव लक्षात घेता , मागच्या सभेतच नगराध्यक्षांनी कोविड सेंटर उभे करण्याबाबत मुख्याधिकारी कडून मार्गदर्शन मागितले होते परंतु तेवढ्या प्रमाणावर डॉक्टर आणि नर्सेस व इतर स्टाफ उपलब्ध नसल्याने ते शक्य होत नव्हते. हे लक्षात आल्यावर नगराध्यक्षांनी अपरान्त हॉस्पिटल चे संचालक डॉ. यतीन जाधव यांच्याशी या विषयावर चर्चा केली. डॉ. यतीन जाधव यांनी तातडीने या विषयाबाबत चा प्रस्ताव नगरपरिषदेला दिला. या प्रस्तावाचा विचार करून नगराध्यक्षांनी तातडीची विशेष सभा बोलावली व त्याबाबतचा निर्णय आजच्या सभेत झालं.
आत्ताच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता , तसेच सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी जाणारा वेळ लक्षात घेता , कलम ५८/२ या विशेष अधिकार वापरण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी घेतला. या बाबतचा ठराव सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी सभेत अपक्ष नगरसेवक अविनाश केळस्कर अनुपस्थित होते.

