कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिवसेना तालुका प्रमुख बाळु परब यांना पत्रकार परिषद घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील शिवभोजन योजना बंद असल्याचे मान्य करावे लागले यातच भाजपाचा विजय-* *प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई* *जिल्हा सरचिटणीस , भाजपा

 

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴वेंगुर्ले :दि.२६**शिवसेना तालुकाप्रमुख बाळु परब यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवभोजन योजना लवकरात लवकर वेंगुर्लेत सुरु करु असे सांगावे लागले म्हणजेच सद्यस्थीतीत शिवभोजन योजना बंद असल्याचे मान्य केले .मुळात भाजपा ची हीच तक्रार होती की, संपुर्ण महाराष्ट्रात शिवभोजन योजना सुरू आहे परंतु वेंगुर्ले तालुक्यात ही योजना बंद असल्याने गोरगरीब जनता व परप्रांतीय मजुर यांना त्याचा लाभ मिळत नाही.
माजी सभापती म्हणून काम केलेले शिवसेना तालुका प्रमुख बाळु परब यांना माहिती नाही की शिवभोजन योजना ही लाॅकडाऊन पुर्ती मर्यादित नाही . ही योजना त्यांच्याच ठाकरे सरकारने जानेवारी २०२० मध्ये सुरू केली .ह्या शिवभोजन योजनेची संपुर्ण महाराष्ट्रात सद्यस्थीतीत ८९३ केंद्र सुरू आहेत अशी कागदोपत्री आकडेवारी सांगते . सुरुवातीला ही योजना सुरू केली तेव्हा १० रुपयाला शिवभोजन थाळी उपलब्ध होती.परंतु गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊन मध्ये सरकारने ५ रूपयांमध्ये शिवभोजन दिले व ह्या वर्षी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लाॅकडाऊनच्या एक महीना कालावधीत मोफत शिवभोजन योजना चालू केली .याची माहिती पहिल्यांदा घ्यावी .
मुळात तालुका प्रमुख बाळु परब यांना त्यांचाच सरकारची शिवभोजन योजनेची माहिती नसणे म्हणजे शोकांतिका आहे .गेल्या वर्षी नगराध्यक्ष राजन गिरप व आम्ही पुढाकार घेतला नसता तर लाॅकडाऊन काळात सुद्धा ही योजना सुरू झाली नसती .पाहिजे तर खातरजमा करण्यासाठी बाळु परब यांनी तहसीलदार – पुरवठा विभागाशी संपर्क साधावा .कारण नगराध्यक्ष राजन गिरप यांनी हे शिवभोजन लाभार्थ्यां पर्यंत पोहोचण्यासाठी गाडी व कर्मचारी नगरपरिषदेतर्फे उपलब्ध करून दिला होता .त्यामुळे परप्रांतीय मजुरांना लाॅकडाऊनच्या काळात शिवभोजन मिळु शकले. त्यावेळी सुद्धा तालुका प्रमुख बाळु परब यांनी टीका केली होती की आमच्या सरकारच्या योजनेचे भाजपा ने श्रेय घेऊ नये . परंतु बाळु परब यांना सांगावे लागते की तुमच्या सरकारची लोकाभीमुख योजना संपुर्ण जिल्ह्यात कीमान कागदोपत्री तरी सुरु आहेत , परंतु वेंगुर्ले तालुक्यात ही योजना पुर्णपणे बंद आहे .ह्याला सत्ताधारी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी जबाबदार आहेत .कारण योजना बंद असल्याने गोरगरीब जनतेला त्याचा लाभ मिळत नाही हे सत्ताधारी शिवसेनेचे अपयश आहे . ज्याप्रमाणे शासकीय कामाचे ठेके घेण्यासाठी बाळु परब कार्यतत्पर असतात त्याचप्रमाणे शिवभोजन योजना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असते तर सर्वसामान्य गरीब लोकांचे आशिर्वाद मिळाले असते .
*भाजपाने लक्ष वेधल्यावर शिवभोजन योजनेची जाहीरात निघाली .*
ज्यावेळी *शिवभोजन योजना म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण* ही टीकात्मक बातमी वृत्तपत्रांतून प्रसिध्द झाली त्यावेळी शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली व लगेच शिवभोजन योजनेची जाहीरात प्रसिद्धी माध्यमातून द्यावी लागली , हेच सक्षम विरोधीपक्ष भाजपाचे यश आहे .
*शिवभोजन योजने प्रमाणे ठाकरे सरकार कोवीड काळात सोयीसुविधा देण्यात कमी पडले .
राज्यातील कोरोना परीस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे . ठीकठीकाणी आॅक्सीजनची कमतरता भासत आहे . तसेच कोवीड रुग्णांना रेमडेसेवीर इंजेक्शन मीळत नाहीत . त्यामुळे ठाकरे सरकार जनतेला आरोग्य सुविधा , औषध पुरवठा , आॅक्सीजनचा पुरवठा , रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.
मान. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनानुसार सेवा कार्य अधिक जोमाने आणि व्यापक करण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी व योग्य निर्बंध पाळण्यासाठी गावा – गावातील युवक मंडळे व सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित करून *कोवीड अनुशासन कमीट्या* बनविण्यात येणार आहेत . सिंधुदुर्गातही अशा प्रकारच्या स्थानिक समित्या बनवुन लोकांना मदत करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते कामाला लागले आहेत .
बाळु परब ज्या पंचायत समिती मतदार संघाचे नेत्रुत्व करतात त्या तुळस पंचायत समिती मतदार संघातील आरोग्य यंत्रणा ढेपाळल्यामुळे तसेच तुळस – बेहेरे वाडी येथील कंटोनमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरणासाठी शासकीय यंत्रणा उपलब्ध नसल्याने भाजपा च्या वतीने व संजु विरनोडकर टीमच्या सहकार्याने संपुर्ण वाडी निर्जंतुकीकरण करण्यात आले यावरुन सरकारचे अपयश दिसून येते .
सत्ताधारयांच्या अपयशामुळे व आमदार – खासदारांच्या दुर्लक्षामुळे वेंगुर्ले तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ढेपाळलेली आहे .आरोग्य विभागाकडे अपुरा मनुष्यबळ व साधनांचा अभाव असल्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील कंटोनमेंट झोनमध्ये साधी जंतूनाशक फवारणी सुद्धा होत नाही .त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून भाजपा वेंगुर्ले तालुक्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ व युवक मंडळाना सोबत घेऊन निर्जंतुकीकरण मोहीम सुरू केली आहे .आतापर्यंत चार ते पाच गावात भाजपा च्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी पुर्ण केली आहे .
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!