◾म्हापण पागेरेवाडी येथिल कोविड योद्धा संगीता परब यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी..
◾अवघ्या १५ दिवसांच्या चिमुकलीला मागे ठेवून माऊलीची संपली जीवनयात्रा..
◾त्यांच्या अकाली जाण्याने म्हापण पंचक्रोशीतून व्यक्त केली जात आहे हळहळ..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ला,दि-२६ :- म्हापण पागेरेवाडीतील कोविड योद्धा सौ समृद्धी सुमित सावंत (माहेरील नाव) यांचा काल जिल्हा रुग्णालयात कोविड कक्षामध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, ७ वर्षांचा मुलगा आणि अवघ्या १५ दिवसांची चिमुकलीला मागे ठेवून माऊलीची जीवनयात्रा संपली त्यामुळेच त्यांच्या या अकाली निधनाने संपुर्ण म्हापण पंचक्रोशी शोकसागरत बुढली आहे. त्या कोविड योद्धा असल्याने त्यांच्या विषयी जनमानसात आदरच स्थान होत. त्या स्वभावाने प्रेमळ, मनमिळावू व हसतमुख होत्या
भाजपा कार्यकर्ते संजय परब यांच्या त्या सुकन्या. अजगणी येथे त्यांचे माहेर पण मालवण कट्टा येथे आरोग्य विभागात कार्यरत असल्याने त्या म्हापण वरुन ये-जा करत.
कालच त्यांच्या अंत्यविधी करण्यात आल्या. अशा या कोविड रणरागिणीला संपूर्ण म्हापण पंचक्रोशीतून सोशियल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यांच्या पवित्रा आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना करण्यात आली त्याचप्रमाणे ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना सुध्दा यावेळी करण्यात आली.

