आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾दोडामार्ग तालुक्यातील काही नागरिक रेशन कार्ड वरील नावे ऑनलाईन न झाल्यामुळे धान्यापासून वंचित..

 

◾ धान्य पुरवठा विभागाच्या या ढिसाळ कामकाजा बाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-२६ :- दोडामार्ग तालुक्यातील अनेक नागरीक रेशन कार्ड किंवा त्यावरील नावे ऑनलाईन न झाल्यामुळे धान्यापासून वंचित झाले आहेत. धान्य पुरवठा विभागाच्या या ढिसाळ कामकाजा बाबत नागरिकांमधून पुरवठा विभागा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

रेशन कार्ड काडून एक-एक वर्ष होऊन सुध्दा केवळ ते ऑनलाईन न झाल्यामुळे नागरिकांना धान्य मिळत नाही तसेच ते ऑनलाईन झाले का ? झाले नाही तर ते कधी होणार ? याची विचारपूस करण्यासाठी गरीब जनता मात्र तालुक्यातील पुरवठा विभागाच्या दाराचे उंबरठे झिजवत आहे.

कोरोना संकटाच्या च्या या काळात सर्व व्यवसाय, काम धंदे बंद असताना शासनाकडून मिळणारे हे धान्य मिळत नसल्याने जगायचं कसे? हा प्रश्न आता त्या गरीब जनतेला पडला आहे.

त्यामुळे या विषयावर लक्ष घालून यावर लवकरात लवकर शासनाने योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी गरीब जनते मधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!