आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

◾रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस, चिपळूण तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने, अपरांत हॉस्पिटल चिपळूणमध्ये ५ मे ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-२६ :- कोरोना या महाभयंकर महामारीमुळे देशात सगळीकडेच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोकांना आज या रोगाने ग्रासले गेल आहे. हजारो लोकांचा दररोज मृत्यू होत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत हा रोग आटोक्यात आणण्यासाठी आपण चांगले प्रयत्न केले आहेत.परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या महामारीने रौद्र रूप धारण केलेले आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण असल्याने आपण सगळेच हतबल झालेले आहोत. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. म्हणूनच कोरोना विरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून व शासनाच्या नियम आणि अटींना अधीन राहून प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर आवाहनाला प्रतिसाद म्हणून रत्नागिरी जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष विजय भोसले यांच्या नेतृत्वाने चिपळूण शहर व तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तसेच अपरांत हॉस्पिटल आणि सिव्हिल रक्तपेढी, रत्नागिरी यांच्या विशेष सहकार्याने बुधवार दिनांक ५ मे २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबिरामध्ये रक्तदात्यांनी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन चिपळूण काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह यांनी केलेले आहे.तरी इच्छूकांनी भरतशेठ लब्ध्ये 9011512929, लियाकत शाह 8805363737,सुधीर शिंदेल 9890078888, करामत मीठागरी 9422632126, कबीर काद्री 989025508, सौ सफा गोटे 9158698644, सौ. संजीवनी शिगवण 7030533419, राकेश दाते 9970078559, दीपक निवाते 9309542779, महेंद्र मांडके 9503000996 या नंबरवर संपर्क साधून आपली नावे सोमवार दिनांक ३ मे २०२१ रोजी सायंकाळी ५ पर्यंत नोंदवावीत. रक्तदान शिबिराला येताना मास्क सह रक्तदात्याच्या ओळखपत्राचा पुरावा घेऊन यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!