आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

◾चिपळूण अलोरे क्रांती युवा मंडळ वरचीवाडीचा आदर्श उपक्रम..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-२५ :- तालुक्यातील अलोरे क्रांती युवा मंडळ वरचीवाडीचा नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न असतो.गेले वर्षभर कोरोना महामारीने पूर्ण जगात थैमान घातले आहे.राज्य सरकार असो व केंद्र सरकार या महामारीवर मात करण्यासाठी आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहेत.. याचाच एक भाग म्हणजे लसीकरण…सामान्य लोकांमध्ये लसीकरणा बाबत अजूनही गैरसमज आहेत..आणी हेच आवाहन आमच्या क्रांती युवा मंडळाने पेलले. वरचीवाडीतील प्रत्येक घरोघरी जाऊन सर्व जेष्ठ मंडळीचे लसीबाबत गैरसमज दूर केले व लोकांत जनजागृती निर्माण केली.वाडीतील प्रत्येक ४५ वर्षावरील लोकांची यादी तयार करून त्यांची आधारकार्डची एक कॉपी घेतली..लस उपलब्ध बाबत आरोग्य केंद्राशी नेहमीच संपर्क साधून आहेत.लस उपलब्ध झाली की वाडीत १०० % लसीकरण करण्याचा मानस व्यक्त करून तो पूर्ण करण्याचा विश्वास दाखविला आहे. या मंडळातर्फे गावातील मंडळ, संस्था व लोकांना आवाहन करण्यात आले की आम्ही जसा एक प्रयत्न केला तसा आपणही लोकांमध्ये लसीबाबत जनजागृती करावी व आपल्या वाडीचे, गावाचे ,तालुक्याचे पर्यायाने देशाचे १००% लसीकरण करूया व अदृश्य विषाणूची आपल्या जीवनातुन हाकलपट्टी करूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!