◾चिपळूण मुस्लिम समाजाच्या सभासदांचा कोरोना रुग्णांकरीता दिलासा देणारा उपक्रम..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-२५ :- गोवळकोट मदरसा येथे उद्या सोमवार दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता कोव्हिड सेंटर चे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सुरुवात करण्यात येत आहे.
सध्याच्या कोरोना काळात चिपळुणातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बेडची व अॅक्सिजनची उपलब्धता होत नाही म्हणून तातडीने गोवळकोट मदरसा चे ट्रस्टी ज.मॊलाना दाऊद कुदे साहेब, ज. लियाकत खतिब , ज. शब्बिर खतिब, ज इम्रान खतिब व मदरस्यांचे सर्व ट्रस्टी यांनी सामाजिक भावनेतून ही इमारत कोव्हिड सेंटर करिता इमारत उपलब्ध करुन दिलेली असून चिपळुण मुस्लिम समाजाच्या सदस्यांनी येथे बेड उपलब्ध करुन दिलेले आहेत, या पूर्वी मागिल वर्षी मुस्लिम समाजाच्या सदस्यांनी काॅटेज हाॅस्पिटल ला बेड व सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या.
या सेंटर मध्ये सध्या १२ आॅक्सिजनचे बेड व १४ बेड चे आयसोलेशन वार्ड अतितातडीने तयार करण्यात आले आहेत.पुढील आवश्यकतेनुसार बेड मध्ये वाढ करण्यात येईल. येथे शासकीय नियमानुसार व शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच सुविधा व ऒषधोपचार करण्यात येणार आहे.
हे कोव्हिड सेंटर लाइफ केअर हाॅस्पिटल चिपळूण चे डाॅक्टर इसहाक खतिब, डाॅ समिर दळवी व त्यांची संपूर्ण टीम चे निगराणी खाली हे सेंटर सर्व जनतेसाठी चालविले जाणार आहे.

