◾मडूरा – रेडकरवाडी येथील सदाशिव धोंडू जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा,दि-२५ :- मडूरा – रेडकरवाडी येथील सदाशिव धोंडू जाधव (९५) यांचे शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मडूरा श्री देवी माऊली देवस्थान उपसमितीचे ते सदस्य होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन विवाहित मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष दीपक घाडी यांचे ते वडील होत.

