◾खांबाळे ग्रामपंचायत कर्मचारी आणि निवडक ग्रामस्थांनी गावात प्रत्येक वाडी वर फिरून कोरोना प्रादुर्भाव कसा रोखावा त्याबद्दल केली जनजागृती..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴वैभववाडी,दि-२५ :- वैभववाडी तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यासाठी खबरदारी म्हणून खांबाळे ग्रामपंचायत कर्मचारी आणि निवडक ग्रामस्थ यांनी आज गावात प्रत्येक वाडी वर फिरून कोरोना प्रादुर्भाव कसा रोखावा त्याबद्दल जनजागृती केली. तसेच काही नियम व अटी यांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. अशी सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात आली. त्यावेळी खांबाळे ग्रामसेवक कोकणी, उपसरपंच गणेश पवार, अंबाजी पवार, दत्तात्रय परब, रुपेश कांबळ, सुधीर लोके, नारायण पाटील उपस्थित होते.

