◾श्री अवधुतानंद सरस्वती महाराज यांचे महानिर्वाण..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-२५ :- बांदा शहरातील प्रसिथ्द साईभक्त कै. बाप्पा केसरकर यांचे नातु प. पु. सदगुरू श्री अवधुतानंद महाराज यांचे दि. २४ एप्रील सायं ६:१० मी. तेलंगणा (पँरांबुर) येथिल अवधुताश्रमा मध्ये महानिर्वाण झाले.
बांदा शाहरात त्याचे आजाेबा कै बाप्पा केसरकर यांच्या रहात्या घरी त्याचे मामा कै. किसनदास केसरकर व ज्ञानेश्वर केसरकर यांच्या अंगाखाद्यावर खेळुन ते लहानाचे माेठे झाले हाेते. अध्यात्माचा वारसा त्यानी कै. बाप्पांकडुन घेतला हाेता. १९८२ साली बांद्यातुन गेल्यावर दत्तगड कल्लुर आंध्रप्रदेश येथे जाऊन वास्तव्य करुन आश्रमात अध्यात्मीक कार्य सुरू लाेकाना मार्गदर्शन केले.१९९३ साली त्यांनी अडीज वर्षे लागुन नर्मदा परीक्रमा पुर्ण केली. १९९६ साली कल्लुर (आंध्रप्रदेश) ते शिर्डी लाेटांगण यात्रा पुर्ण केली हाेती. शिर्डीला ते लाेटांगण महाराज म्हणुन प्रसिध्द हाेते.नंतर त्यांनी पँरांबुर तेलंगणा येथे अवधुताश्रम निर्माण करुन, धार्मिक आध्यात्मिक शेञात भक्तगणाना मार्गदर्शन करुन भक्त संप्रदाय निर्माण केला हाेता. तेथे श्री दत्तजयंतीचा उत्सव ते मोठ्या भव्यतेने साजार करत. अनाथांसाठी आश्रम तसेच गोसेवेसाठी गोशाळा आदी कार्य त्यांनी केले.
त्यांचे पुर्वाश्रमीचे नाव दया पिळणकर होते. बांदा खेमराजचे निवृत्त शिक्षक अच्युत पिळणकर हे त्यांचे बंधू होत. स्वामीजी बांदा परिसरात दया महाराज म्हणून ओळखले जात.
आपल्या मुळगाव असलेल्या बांदा गावावर त्याचे फार प्रेम हाेते. व ते वेळाेवेळी बाद्यातील धार्मिक व सामाजीक उपक्रमांची माहीती घेत. बांद्यातील साईमठाच्या विविध उपक्रमा बाबत ते वेळाेवेळी मार्गदर्शन करत. त्यांच्या या निर्वाणामुळे बांदा परीसरात, महाराष्ट्र, आध्रप्रदेश ,तेलंगणा या राज्यातील भक्त परीवारात शाेक व्यक्त करण्यात येत आहे.

