◾घरडा कंपनीतील स्फोट प्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-२५ :- लोटे एमआयडीसीत घरडा केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये मृत्यू पावलेल्या ५ कामगारांच्या मृत्यूस जबाबदार ठरवत खेड पोलिसांनी कंपनी व्यवस्थापन हेडवर गुन्हा दाखल केला आहे . चौकशीअंती हा गुन्हा २२ एप्रिल रोजी गुरुवारी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम – यांनी दाखल केला आहे . हा स्फोट गेल्या महिन्यात २० मार्च रोजी सकाळी ८.३० वा . च्या सुमारास झाला होता . विद्युत निरीक्षण विभाग रत्नागिरी यांनी दिलेल्या अहवालात कंपनी व्यवस्थापनचा हलगर्जीपणा स्पष्ट झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे , असे पोलिसांनी सांगितले .या स्फोटात घरडाचे कर्मचारी बाळासाहेब रामचंद्र गाढवे ( वय ४ ९ , रा.खेर्डी माळेवाडी चिपळुण ) , महेश महादेव कासार ( वय २६ , भरणे ता.खेड , मुळ घारी , ता . पोलादपूर , जि . रायगड ) , आशिष चंद्रकात ( वय ३१ गोगावले . भागडी , शिरळ , चिपळूण ) , राजेश फकिरा मानतकर ( वय ३ ९ , घरडा कॉलनी लोटे , खेड ) , अभिषेक सुरेश कवडे ( पागमळा , ता . चिपळुण ) या तब्बल ५ कामगारांचा मृत्यू झाला होता . याप्रकरणी घरडा केमिकल्स लि . कंपनीचे प्रोडक्शन हेडचे पी . बी . पाटील , इलेक्ट्रीकल हेड व्ही . बेंजामिन व सेफ्टी हेड एम . व्ही . मालगट्टे , लोटे एम . आय . डी . सी . यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

