आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾स्वस्तिक कन्स्ट्रक्शनने मारलेल्या चरात पडुन गवारेड्याचा दुर्दैवी मृत्यू ; इन्सुलीतील घटना

 

◾गवारेड्याच्या मृत्युस स्वस्तिक कन्स्ट्रक्शन जबाबदार ; ग्रामस्थांचा आरोप..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि-२५ :- इन्सुलीत स्वस्तिक कन्स्ट्रक्शनने मारलेल्या पोटकालव्याच्या चरात पडुन गवारेड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.आज सकाळी माऊली ‌मंदिर जवळील शेतात गेलेल्या ग्रामस्थांच्या ही घटना निदर्शनास येताच तात्काळ वनविभागाला कळवण्यात आले,वनविभाग कर्मचारी तात्काळ हजर सुद्धा झाले.घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.यावेळी गावातील ग्रामस्थांनी स्वस्तिक कन्स्ट्रक्शन गवाच्या मृत्युस‌ कारणीभूत असल्याचे आरोप केले, स्वस्तिक कन्स्ट्रक्शनला सरपंच-उपसरंपच आणि ग्रामस्थ यांनी १ एप्रिलला स्वस्तिक कन्स्ट्रक्शनला जोपर्यंत मुख्य कालव्याला पाणी येत नाही तोपर्यंत पोटकालव्याची खोदाई करु नका अशी विनंती केली होती आणि तसे निवेदनही दिले होते, तरी सुद्धा संबंधित कंपनीने मनमानी करत चर मारले यावेळी ग्रामस्थांनी अडवत चर बुजवा अशी विनंती केली होती, यावेळी वन्यप्राणी अडकण्याची भिती सुद्धा ग्रामस्थांनी ‌उपस्थित केली होती, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी तरीसुद्धा ते मारलेले तसेच ठेवले आणि आज एका गवारेड्याला आपले प्राण गमवावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!