◾भाजीच्या दोन गाड्या मोफत देतो पण जनतेची लूटमार थांबविण्याचे चिपळूण भाजी व्यापाऱ्यांचे प्रशासनाला आवाहन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-२४ :- महर्षी आण्णासाहेब कर्वे भाजी व्यापारी संघाने प्रशासनाच्या सुचनेनुसार १७ एप्रिलपासून भाजी व्यापार पूर्णपणे बंद ठेवलेला असताना काही लोक पानगल्ली,नगरपरिषद मालकीच्या भाजी मंडई आवारात तसेच खेर्डी परिसरात कोरोना काळात जनता आर्थिक संकटात सापडली असताना त्यांची अव्वाच्या सव्वा दराने भाजी विकून लूटमार करत आहेत.हे प्रशासनाला दिसत नाही का ? असा सवाल उपस्थित करताना आम्ही जनतेसाठी मोफत एक नाही तर दोन अत्यावश्यक भाजीच्या गाड्या प्रशासनाच्या ताब्यात देतो त्यांनी भाजी वितरण करावे पण जनतेची लूटमार थांबवावी असे आवाहन चिपळूण भाजी व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी संघाचे उपाध्यक्ष भरत गांगण, राकेश शिंदे,मारुती करंजकर,मेहबूब तांबे,दत्तूशेठ वाळुंज आदी उपस्थित होते तर अध्यक्ष सुधीरशेठ शिंदे यांनी मोबाईल द्वारे संपर्क साधून सहभाग घेतला होता.
शहरात नियमांची पायमल्ली होताना टोमॅटो ८० रुपये किलो दराने खुलेआम विकली जात आहेत,नगरपालिकेच्या आवारातच फळविक्रेते दिवसभर दुकाने उघडी ठेऊन आहेत.यावर तहसीलदार,प्रांताधिकारी यांचा वचक नाही.मात्र पोलिसांची भूमिका कौतुकास्पद असल्याचे सांगितले.पालिका प्रशासन काय करतेय.गुन्हे का दाखल होत नाहीत.याबाबत नगराध्यक्षांकडे संपर्क केला असता सी.ओ. आपले ऐकत नसल्याचे सांगितले जाते अशी माहिती भरत गांगण यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे येथील प्रशासनाकडून पालन केले जात नाही असे देखील यावेळी सांगण्यात आले.

