◾शॉर्ट सर्किटमुळे डिंगणे-बांबरवाडी येथे भीषण आग..
◾सुमारे ४ एकर क्षेत्रातील काजू बागायत जळून खाक ; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-२४ :- डिंगणे-बांबरवाडी येथे आज दुपारी शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागल्याने सुमारे ४ एकर क्षेत्रातील काजू बागायत जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
यामध्ये महेश बांदेकर, राजन बांदेकर यांच्या मालकीची काजू बाग जळून गेली. ऐन काजू हंगामात काजू बाग जळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसा नीस सामोरे जावे लागले. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

