आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

◾लोटे एमआयडीसीतील सर्व कंपनी मॅनेजमेंटनी कोविडं सेंटर उभे करावे ; संदिप फडकले

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-२४ :- कोरोना रोगाचा  प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.संपूर्ण भारत देशासह ग्रामीण भागात सुद्धा कोरोना रोगाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना हॉस्पिटल कमी पडत आहे असे ग्रामीण भागात दिसून येत आहे. आणि अपुऱ्या हॉस्पिटल सुविधेमुळे अनेकांना प्राण गमवावा लागत आहे.खेड तालुक्यात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा या रोगाची झळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.लोटे एमआयडीसी मध्ये कोविडं सेंटर उभारले तर त्याचा भरपूर फायदा कामगार वर्ग तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांना होईल. कारण हॉस्पिटल सुविधा नसल्याने चिपळूण किंवा रत्नागिरी येथे जावे लागत आहे.यासाठी लोटे एमआयडीसी मधील सर्व कंपनीतील मॅनेजमेंट यांनी एकत्र येऊन १०० बेड चे कोविडं हॉस्पिटल उभे करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस संदीप फडकले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!