◾खासदार साहेब हा तर रडीचा डाव म्हणायचा..
◾महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादन मोबदल्याचा पत्ता नाही,निष्कृष्ट कार्यपद्धतीमुळे महामार्ग किती काळं टिकेल याची शाश्वती नाही आणि लोकप्रतिनिधी टोलवसुलीसाठी पॅड बांधून तयार..
◾लोकप्रतिनिधींच्या या अशा स्वार्थीवृत्तीमुळेच जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर…मनसेची घणाघाती टिका
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि-२४ :- यायाधी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प व लोकप्रतिनिधींच्या फॉरच्युनर याची खमंग उलटसुलट चर्चा ऐकिवात होतीच पण आता तर नवीन टोलवसुली कंपनी व लोकप्रतिनिधी हितसंबंध हे नवीन “झेंगाट” उघड झाले आहे. वास्तविक जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ प्रकल्प सुधारणा व रुंदीकरणाचे काम चालू झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने स्थानिक प्रकल्पग्रस्त जनतेवर शासनाकडून अन्याय झाल्याच्या असंख्य घटना जिल्हावासीयांनी अनुभवल्या आहेत. मात्र यादरम्यान लोकप्रतिनिधींनी प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडून तसेच वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन त्यांच्यावर अन्याय करून जबाबदारी झटकुन आजपर्यंत वेळ मारून देण्याचेच काम केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पग्रस्तांना अजूनही हक्काचा भूसंपादन मोबदला मिळालेला नाही याची साधी दखलही जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी घेत नाहीत हे जिल्हावासियांचे दुर्दैव आहे.मिसिंग प्लॉट प्रकल्पग्रस्तांच्या समस्या,लवाद मंजुरी मोबदला अशा कित्येक प्रलंबित लाभ समस्यांनी प्रकल्पग्रस्त ग्रासले असून स्वतःच्या हक्काचे मोबदल्यासाठी प्रशासनाकडे अक्षरक्ष: याचना करत आहेत मात्र खासदारांना त्यांच्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही मात्र महामार्ग प्रकल्पात टेंडर मिळवण्यासाठी वेळच वेळ आहे. आजपर्यंत महामार्गाचे एकूण झालेले काम पाहता कामाची कार्यपद्धती व कामाचा दर्जा यासंदर्भात अनेक आक्षेप,घटना पटलावर असताना लोकप्रतिनिधी कंत्रातदारांशी असलेल्या हितसंबंधांमुळे चकार शब्द काढायला तयार नाहीत. मात्र अर्धवट व दर्जाहीन काम झालेल्या महामार्गादरम्यान स्वतःच्या कुटुंबीयांची कंपनी स्थापन करून टोलवसुलीसाठी पाठपुरावा करून कंत्राट मिळवण्यास अतिउत्साह दाखवतात याला नेमके म्हणावे तरी काय..? बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते यांची उदाहरणे देताना ह्या लोकांनी जिल्ह्यात आलेल्या प्रकल्पामध्ये टेंडर मिळवली नाहीत याचा विसर लोकप्रतिनिधींना होतो आहे. जिल्ह्यातील जनतेनेच अशा या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना धडा शिकवावा अशी घणाघाती टीका मनसेचे कुडाळ उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

