◾माणगांव मध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची केली जाते रॅपिड टेस्ट..
◾मात्र एकही व्यक्ती कोरोना बाधित सापडला नाही..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴माणगांव,दि.२३ :- कोरोना साखळी तोडण्याकरिता सरकारने राज्यात कडक निर्बंध लावलेले असतानाही माणगांवमध्ये आज विनाकारण फिरणाऱ्या २७ जणांची माणगांव आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रॅपिड टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये ० जण कोरोना बाधित आढळले असून त्यामुळे माणगांव एरियात समाधानाचे वातावरण आहे.विनाकारण फिरणाऱ्यांना एवढे सांगून विनंती करुन समजत नसेल तर रॅपिड टेस्ट करायचा एकमेव मार्ग आज अवलंबण्यात आला. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलीस कडक कारवाई करीत असून जीवित सुरक्षिततेसाठी नागरिकांनी घरीच थांबावे. विनाकारण बाहेर फिरू नये असे पोलिस वारंवार आवाहन करत आहेत.
राज्यात कोरोना स्थिती गंभीर वळणावर असून ही साखळी तोडण्यासाठी आघाडी सरकारने राज्यात १ मे पर्यंत ब्रेक दि चेन मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध घातले आहेत. लोकांचे जीवित सुरक्षित ठेवणे याला सरकारने प्रथम प्राधान्य दिले असून त्यासाठीच हे निर्बंध राज्यात लागू करण्यात आले आहेत. यावेळी माणगांव पोलीस हेड कॉन्स्टेबल धोत्रे,सचिन सोनसुरकर व होमगार्ड शुभम शेडगे, सागर भिसे उपस्थित होते.

