जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली विशेष दखल, ५७ ॲम्बुलन्स उपलब्ध – संजना सावंत
◼️रुग्णवाहीकेसाठी कंट्रोल रूम चोवीस तासांसाठी कार्यान्वित, यासाठी कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत…
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २४ पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बैठकीत, कोरोना नियंत्रण उपाययोजना सूचविताना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी भाडे तत्वावर ॲम्बुलन्स घेण्याची सूचना केली होती. याची दखल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तात्काळ घेत सिंधुदुर्ग उपप्रादेशील परिवहन कार्यालयात यासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्स कंट्रोल रूम सुरु केला आहे.
तसेच ५७ ॲम्बुलन्स उपलब्ध केल्या आहेत. १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे दालनात पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना उपायोजना यासाठी आयोजित सभेत अध्यक्ष संजना सावंत यांनी खनिकर्म विभागाकडून जिल्ह्यासाठी १३ ॲम्बुलन्स देण्यात येणार होत्या. त्या अद्यापही प्रलंबित असल्याने या वेळ काढून धोरणामुळे कोणतीही जीवित हानी होऊ नये. यासाठी जिल्ह्यातील सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या ॲम्बुलन्स भाडेतत्त्वावर घेण्याबाबत चर्चा घडवली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची विशेष दखल घेऊन कंट्रोल रूम सुरू करणे बाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांना आदेश दिले.
या कंट्रोल रूमसाठी दोन संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. यात 02362-229020 आणि 9359788334 या नंबरचा समावेश आहे. हा कंट्रोल रूम चोवीस तासांसाठी कार्यान्वित असून, यासाठी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळी ७ ते २, दुपारी २ ते ११ आणि रात्री ११ ते ७ या तीन सत्रात विभागणी करून ॲम्बुलन्स कंट्रोल कक्ष सुरू असेल. सद्यस्थितीत कुडाळ तालुक्यासाठी २२, कणकवली तालुक्यासाठी १०, सावंतवाडी तालुक्यासाठी ७, मालवण तालुक्यासाठी ९, वेंगुर्ला तालुक्यासाठी ३, देवगड तालुक्यासाठी ५, दोडामार्ग तालुक्यासाठी १ अशा मिळून ५७ ॲम्बुलन्स जिल्ह्यासाठी नोंदणीकृत करण्यात आलेल्या आहेत.
यासाठीचे आकारण्यात येणारे अधिकृत दर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी जाहीर केले आहेत. यामध्ये मारुती व्हॅनसाठी २५ किलोमीटर किंवा २ तासांकरिता ७५० रुपये व २५ किलोमीटरपेक्षा जास्त वापरासाठी प्रति किलोमीटर १४ रुपये. यात टाटा सुमो, मारुती इको, मेटॅडोर सदृश्य वाहनासाठी २५ किलोमीटर किंवा २ तास यासाठी ९०० रुपये व २५ किलोमीटरपेक्षा जास्त वापरासाठी प्रति किलोमीटर १४ रुपये. टाटा ४०७, स्वराज माजदा टेम्पो, ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी २५ किलोमीटर किंवा २ तासासाठी १००० रुपये व २५ किलोमीटरपेक्षा जास्त वापरासाठी प्रति किलोमीटर २० रुपये आणि आय. सी. यु. वातानुकूलित वाहनासाठी २५ किलोमीटर किंवा २ तासाकरिता १००० दोनशे रुपये आणि २५ किलोमीटरपेक्षा जास्त वापरासाठी प्रति किलोमीटर २४ रुपये हे दर निश्चित करून दिलेले आहेत.

