◾संत निरंकारी मिशनच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-२४ :- सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशनच्या वतीने कोरोना रूग्णांसाठी मदतीचा हात देण्यात येत आहे.यातूनच दिल्ली येथे विशाल सत्संग भवनमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी अद्ययावत हाॕस्पिटल सुरू करण्यात आले आहे. त्यात १००० पेक्षा जादा बेडची सोय आहे. दिल्ली सरकारच्या मदतीने याठिकाणी रुग्णांच्या जेवण खाण्याची सोयदेखील करण्यात येत आहे. दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या सुविधांची पाहणी केली तसेच त्यांनी सद्गुरु माता सुदिक्षा महाराज यांना धन्यवाद दिले त्याचप्रमाणे देशभरातील सर्व सत्संग भवन कोविड लसीकरण केंद्रासाठी उपलब्ध करून देण्याबाबतही मिशनच्या वतीने केंद्र सरकारला प्रस्ताव देण्यात आला आहे त्याला मंजुरी मिळाली असून मिशनच्या देशभरातील शेकडो सत्संग भवनातून आता कोरोना लसीकरण सुरू झाले आहे.त्याचप्रमाणे संत निरंकारी मिशन कडून धान्य ,लंगर वाटप तसेच पंतप्रधान सहायता निधी आणि अनेक राज्य सरकारांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक मदत करण्यात आली आहे. पीपीई किटस,मास्क ,सॕनिटायझर इत्यादीचा पुरवठाही वैद्यकीय कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध करुन देण्यात आला आहे.सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे.याचा गरजूनां दिलासा मिळत असल्याची माहिती क्षेत्रीय प्रबंधक महात्मा गंगाधर विचारे यांनी दिली.

