आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ऍम्ब्युलन्स कंट्रोलरूम कार्यान्वित..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : विश्राम वारंग

🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२३ :- कोरोना बाधीत रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांपर्यंत पोहचवणे व उपचारानंतर बरे झालेले रुग्ण घरी सोडण्यासाठी खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या रुग्णवाहिका नागरिकांना माफक दरात व वेळेवर माहिती मिळण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ॲम्ब्युलन्स कंट्रोलरुम कार्यान्वीत करण्यात आली आहे. कंट्रोल रुम कडून नागरिकांना त्यांच्या नजीक असणाऱ्या रुग्णवाहिकांची माहिती पुरवण्यात येणार आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे चोवीस तास ही कंट्रोल रुम कार्यान्वीत असणार आहे. सदर कंट्रोल रुमचा संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहे. ०२३६२-२२९०२० आणि मोबाईल क्रमांक – ९३५९७८८३३४ या क्रमांकावर नागरिकांना २४ तास संपर्क साधता येणार आहे.

ज्या नागरिकांना खाजगी रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे, त्यांनी संपर्क साधल्यानंतर संबंधित नागरिकांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाजवळील रुग्णवाहिका चालकाचे नाव व मोबाईल क्रमांक देण्यात येईल. रुग्णवाहिकांसाठी पुढील प्रमाणे भाडे निश्चित करण्यात आले आहे. मारुती व्हॅनसाठी २५ किलोमीटर किंवा २ तासाकरिता ७५० रुपये व २५ कि.मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. १४ रुपये, टाटा सुमो , मारुती ईको, मॅटॅडोर सदृष्य वाहनासाठी २५ कि.मी. किंवा २ तासाकरिता ९०० रुपये व २५ कि.मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. १४ रुपये, टाटा ४०७, स्वराज माजदा, टेम्पो ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी २५ कि.मी किंवा २ तासांसाठी १ हजार रुपये व २५ कि.मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. २० रुपये व आय.सी.यु. वातानुकुलीत वाहनांसाठी २५ कि.मी. किंवा २ तासाकरिता 1 हजार २०० रुपये व २५ कि.मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. २४ रु. या प्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत.

रुग्णवाहिका चालक, मालक यांनी मंजूर भाडे दरापेक्षा जादा दराची आकारणी केल्यास अथवा रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्यास कंट्रोल रुमकडे तक्रार दाखल करता येईल. तक्रारकर्त्याने रुग्णाने नाव, रुग्णवाहिका क्रमांक, कोठुन कोठे असा प्रवास ठिकाण, प्रवासाचा दिनांक व वेळ इत्यादी नमुद करावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!