आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

◼️पूजाताई निकम यांना विशेष सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर..

 

◾आमदार शेखर निकम यांचेकडून करण्यात आले अभिनंदन ; ३२ मे रोजी होणार पुरस्काराचे वितरण..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि-२३ :- नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगावी यांचेकडून महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या अग्र नामांकित निवडक व्यक्तींना दिला जाणारा विशेष सामाजिक गौरव पुरस्कार चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती व सध्याच्या सदस्या पुजाताई शेखरजी निकम यांना नुकताच जाहीर झालेला आहे. या आंतरराज्य सामाजिक गौरव पुरस्काराचे वितरण ३१ मे रोजी बेळगाव येथे होणार आहे. सदर पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. शेखरजी निकम,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, चिपळूण पंचायत समितीचे सभापती,उपसभापती व सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे सौ. पूजाताई निकम यांनी सभापती काळात सर्व शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून कृषी, शिक्षण, घरकुल, आरोग्य, पर्यावरण संवर्धन इत्यादी क्षेत्रात यशस्वीपणे कामगिरी पार पाडली होती. शासनाच्या सर्व योजनांची तळागाळापर्यंत माहिती मिळावी व सर्वसामान्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून ग्रामपंचायत सदस्य व प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले होते. जलसंधारणासाठी नदी,नाले व ओव्हळ यांच्यावरती विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व महिलांच्या योगदानातून बंधारे बांधून पाणी आडवा पाणी जिरवा या शासकीय योजनेची अंमलबजावणी उत्कृष्टपणे केली आहे. आरोग्य, कृषी, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, महिला बचत गट निर्मिती व कार्यशाळेचे आयोजन, नारी महोत्सव, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन हा आंतरराज्य पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे. सौ. पूजाताई निकम यांनी आपल्या मनोगतात हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मनोमन आनंद व्यक्त केला असून आपण आपल्या कार्यक्षेत्रात सभोवतालच्या उपलब्ध साधन सामग्री च्या माध्यमातून उत्कृष्टपणे सर्वसामान्यांच्या साठी काम केले तर यश नक्कीच प्राप्त होते असे मत व्यक्त केले. तर या पुरस्कारात आमदार श्री. शेखरजी निकम व कार्यक्षेत्रातील सर्व पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आजही covid-19 च्या कालावधीत त्यांचे सामाजिक व विविध क्षेत्रात काम निरंतर सेवावृत्तीने चालू आहे. हा आंतरराज्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!