आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीयसामाजिक

◾युवक काँग्रेसतर्फे नागरिकांच्या मदतीसाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी फैसल पिलपिले यांची निवड..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-२३ :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक संकटात सापडले आहेत .अशा नागरिकांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसने पुढाकार घेतला आहे . संपूर्ण महाराष्ट्रात युवक काँग्रेसतर्फे जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करुन मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत . रत्नागिरी जिल्ह्याकरीता चिपळूणचे युवा शहराध्यक्ष फैसल पिलपिले यांची निवड करण्यात आली आहे . युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही निवड केली आहे . रत्नागिरी जिल्ह्यात कोणाला मदतीची आवश्यकता असल्यास त्यांनी ९ ८२३४०५४५४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन फैसल पिलपिले यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!