आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾शहरात होणारे अपघात रोखण्यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांच्या संकल्पनेतून व वृक्ष प्राधिकरण निधीतून बसविण्यात आले बहिर्वक्र आरसे..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.२३-: शहरात होणारे अपघात रोखण्यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांच्या संकल्पनेतून व वृक्ष प्राधिकरण निधीतून १० ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसविण्यात आले आहेत. तसेच शहरात संध्याकाळच्या वेळी नागरिकांना विरंगुळ्यासाठी बसता यावे यासाठी बँच देखील बसविण्यात आले आहेत.

या दोन्ही कामाचे लोकार्पण नगराध्यक्ष संजू परब यांच्या मुख्य उपस्थितीत नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे.यावेळी कट्ट्यावर बॉक्सवेल देखील बसविण्यात येणार असल्याची माहिती परब यांनी दिली.

यावेळी नगरसेवक नासिर शेख, नेमळे सरपंच विनोद राऊळ, केतन आजगावकर, नगरपालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!