आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने घेतली सावंतवाडी तहसिलदारांची भेट..

 

◾कोविड विषयक कामकाजाच्या नेमणूकांबद्दल व शिक्षकांच्या लसीकरणाबाबत झाली सकारात्मक चर्चा..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : अजय भाईप                                      

🎴सावंतवाडी,दि-२३ :- प्राथमिक शिक्षकांच्या कोविड विषयक कामकाजाच्या नेमणूकांमधील त्रुटी व सर्व शिक्षकांचे लसीकरणाबाबत मागण्यांचे निवेदन देण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सावंतवाडी यांच्यावतीने संघटनेचे राज्य संयुक्त चिटणीस म.ल देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेण्यात आली. या भेटीत तहसिलदारांसोबत अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी कोविड-19 ड्युटीवरील सर्व प्राथमिक शिक्षकांचे ड्युटीपूर्वी लसीकरण करणे संदर्भात तहसिलदार कार्यालायकडून आरोग्यविभागाला आदेश पारित करणे, सर्व १०० % प्राथमिक शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे, चेक पोस्ट वरील कामकाजातून महिला शिक्षक, गंभीर आजारी,मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, तसेच ५३ वर्षावरील शिक्षक, गर्भवती महिला, स्तनदा माता असतील यांना या कामातून वगळण्यात यावे, कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परजिल्ह्यात उन्हाळी सुट्टीत मुळ गावी जाण्यासाठी शिक्षकांना मुख्यालय सोडण्याची परवानगी द्यावी, उन्हाळी सुट्टीत काम केले त्याची पर्यायी अर्जित रजा मिळावी आदी मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

सावंतवाडी तहसिलदार श्री.राजाराम म्हात्रे साहेबांनी सर्व मागण्यावर सकारात्मक चर्चा केली व संघटनेच्या मागण्या मान्य केल्या. शिक्षक लसीकरणाबाबतचे आदेश लवकरच देण्यात येतील, संघटनेच्या मागणीनुसार नियुक्ती आदेशांतील त्रुटी दूर करून ज्या शिक्षकांची खरोखर योग्य कारण असल्यास त्यांचे आदेश रद्द करण्यात येतील, तसेच मुख्यालय सोडण्यासंदर्भात परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेण्यात येईल असे तहसीलदार साहेबांनी सांगीतले.

यावेळी राज्य संयुक्त चिटणीस म.ल देसाई, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय शेडगे, सचिव अमोल पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुभाष सावंत, माजी सचिव बाबाजी झेंडे व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!