◾कसाल येथे विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट ; बाहेर फिरणारऱ्यांना बसला चाप ; अनेकांची झाली गोची..
🖥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि-२३ :- जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही गेले दोन दिवस खरेदीच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली होती. गेले दोन दिवस संचारबंदी असली तरी किराणा भाजीपाल्याची दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू होती त्यामुळे खरेदी च्या नावाखाली अनेक जण फिरताना आढळून आले होते .पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली होती या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शुक्रवारी सकाळपासून कसाल बाजारपेठ मुख्य चौकामध्ये आरोग्य विभाग, पोलीस आणि ग्रामपंचायत विभाग ,महसूल विभाग यांच्या संयुक्त मदतीने रँपिड टेस्ट सुरु करण्यात आली. सकाळपासून दुपारपर्यंत अनेकांची तपासणी करण्यात आली.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे प्रशासनाकडून यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. प्रथम विकेट लाँकडाऊन नंतर आता पण पंधरा दिवसाचे लाँकडाऊन शासनाने जाहीर केले आहे . यादरम्यान विनाकारण फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .मात्र तरीही फिरणाऱ्यांच्या संख्येत घट होत नसल्याने प्रशासनाच्या लक्षात आले आहे त्यामुळे आता तपासणीची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाची रँपिड टेस्ट करण्यात येणार आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर फिणाऱ्यांमध्ये काही जण कोरूना पॉझिटिव असल्याची शक्यता आहे. त्यामुळे टेस्ट केल्यावर यातील कितीजन पाँझिटिव्ह आहेत याची माहिती मिळणे आता प्रशासनाला सोपे होणार आहे .त्यामुळे दुपारनंतर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या रोडावली होती आणि विनाकारण फिरणार यांना चांगलाच चाप बसला आहे .

