◾शूरवीर मयूर शेळकेचा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सत्कार..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२३ :- वांगणी येथील पॉइंट्समन श्री. मयूर शेळके यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, अंध माहिलेच्या एका लहान मुलाला भरधाव रेल्वेखाली येता येता काही सेकंदंच्या फरकाने वाचवले. त्यांच्या या शौर्याची दखल सर्व स्तरातून घेतली जात आहे.
आज अशा या शूरवीराच्या धाडसाचे कौतुक, कळवा येथील शासकीय विश्रामगृहात, शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके पालकमंत्री आमदार मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते ₹ १,००,०००/- (रुपये एक लाख ) रोख रकमेचे बक्षीस देऊन करण्यात आले. यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळराव लांडगे साहेब आणि आपल्या रेल कामगार सेनेचे धडाडीचे नेते संयुक्त सरचिटणीस नरेंद्र शिंदे हे उपस्थित होते.

