◼️फूड अँड ड्रग्स कनझ्युमर वेलफेअरच्या वतीने ‘कोविड योद्धयां’ना बिस्किटे-पाणी वाटप..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२२ :- कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याने एनजीओ व सामाजिक संस्था यांनी सरकार सोबत काम करण्यास पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले, त्याला प्रतिसाद देत चिपळूण येथील ‘फूड अँड ड्रग्स कनझ्युमर वेलफेअर कमिटी’ ने कोविड योद्धयांना पाणी, बिस्किटे आणि मास्क वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मागील आठवड्यात केलेल्या आवाहनानुसार दिनांक २१ एप्रिल पासून जे कोविड योध्दा म्हणून काम करणारे शासकीय अधिकारी, पोलिस व आरोग्य विभागाचे कर्मचारी अशा रात्रंदिवस झगडणाऱ्या वर्गाला पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे व मास्क वाटप करण्याचा उपक्रम चिपळूण तालुक्यातील फूड अँड ड्रग्स कनझ्युमर वेलफेअर कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. सोबत कमिटीचे उपाध्यक्ष सुदेश देशमुख, सेक्रेटरी मंगेश कदम, सेल कमिटीचे अध्यक्ष देव चव्हाण तसेच महिला विभाग सेक्रेटरी सौ भुरण आदि पदाधिकारी यांची उपस्थिति होती, अशी माहिती या कमिटीतर्फे दीपक शिंदे यांनी दिली.

