◼️खेंड येथे पथदीप बसविण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली होती पाहणी..
◾युवासेना विभाग प्रमुख निलेश आवले यांचा पाठपुरावा..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२२ :- शहरातील खेंड कांगणेवडी रस्त्याजवळील रसाळ चाल येथे पथदीप बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत युवासेना विभाग प्रमुख निलेश भरत आवले यांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन या विषयाकडे लक्ष वेधले होते.
रसाळ चाळ येथील नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत असल्याने त्यांनी नगर परिषद प्रशासनाकडे पथदीप बसविण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने पथदीप बसवण्याचे काम गेल्या १२ वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे हे काम मार्गी लावण्यासाठी रसाळ चाळीतील रहिवासी व नागरिकांनी खेंड विभागातील युवासेना विभाग प्रमुख निलेश आवले यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर तात्काळ निलेश आवले यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकरी डॉ. वैभव विधाते यांना निवेदन देऊन पथदीप बसविण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन डॉ. वैभव विधाते यांनी पथदीप विभागाचे प्रमुख श्री. महाडिक यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी निलेश आवले यांच्यासह रहिवासी उपस्थित होते. यावेळी श्री. महाडिक यांनी महिन्याभरात रसाळ चाळ येथे पथदीप उभारण्याचे आश्वासन दिले होते.व अखेर निलेश आवले यांच्या प्रयत्नांना यश. व तिथल्या नागरिकांनी निलेश आवले यांचे आभार मानले.

