आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

◾एडगांव फौजदारवाडी येथील दामोदर दत्‍ताराम रावराणे यांचे अल्पशा आजाराने निधन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-२२ :- एडगांव फौजदारवाडी येथील दामोदर दत्‍ताराम रावराणे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे ज्येष्ठ बंधू होतं. दामोदर रावराणे यांचा मुंबईत सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यात मोठा सहभाग होता. मुंबई भांडुप येथील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, भाऊ व भावजय, पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!