आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयसामाजिक

◾३० एप्रिल पर्यंत पोलीस भरती जाहीर करा अन्यथा मातोश्रीला साकडे ; राहुल दुबाले

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-२२ :- ३० एप्रिल पर्यंत पोलीस भरतीची तारिख जाहीर करा अन्यथा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना,राज्यातील बेरोजगार पोलीस पुत्र व सर्व राज्यातील बेरोजगार युवक,युवती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर बाहेर जमा होऊन साकडे घालणार असल्याचा ईशारा राहुल दूबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य यांनी दिला आहे.

आमचे वय संपत चाललंय , आम्ही असेच उपाशी मरुन जाऊ,निवडणूकीत प्रचार सभेत कोरोना येत नाही मग आमच्या भरती मध्ये कसा काय येतोय तेच कळत नाही असा सवाल देखील त्यांनी बेरोजगारांच्या वतीने सरकरला विचारला आहे. आम्ही सुशिक्षित बेरोजगार म्हंणूनच कोरोनाच्या अगोदर बेरोजगारीने मरु अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

मागील ३ वर्षा पासून कुठलीच भरती झाली नाही.३० एप्रिल पर्यंत पोलीस भरती ची तारिख जाहीर करा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्री यांच्या मातोश्री बंगल्या समोर हजर राहणार. आम्हाला आमचा अधिकार द्या. रोटी एक महिन्या साठी दिली. साहेब रोजीचा विचार करा.वय संपल्यावर मजुरी पण करू शकत नाही, लोक कुठे काम देत आहेत? आम्हाला आमचा हक्क हवाय आमचा अधिकार हवाय. सर्व महाराष्ट्रातील व प्रत्येक जिल्हा,तालुका, शहर व गाव यांनी एकत्रित येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

या लढयामध्ये राहुल दुबाले यांचे सोबत राज्य सचिव योगेश कदम यांच्यासह रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सैफ सुर्वे, मुंबई अध्यक्ष सिद्धांत बागुल, मुंबई संपर्क प्रमुख सिध्देश्वर सुळे, पालघर अध्यक्ष अंकित परब, आतिफ गोठे इत्यादी सहबाग घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!