◾वैभववाडी तालुक्यात कोरोना संसर्ग वाढला..
◾कोरोना रुग्णांसाठी घोषणा न करता मदतीचा हात सदैव दिला जाईल ; बँक अध्यक्ष सतीश सावंत
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-२१ :- तालुक्यात कोरोना संसर्ग वाढला होता.सध्या वैभववाडी तालुक्यात २२६ कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.कोरोना रुग्णांची सेवा व त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.वैभववाडी तालुका शिवसेनेना सांगूळवाडी येथील कोरोना रुग्णांसाठी घोषणा न करता मदतीचा हात सदैव दिला जाईल असे आश्वासन शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले.
सांगूळवाडी कोविड सेंटरमध्ये उपाचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना वैभववाडी तालुका शिवसेनेना पक्षाच्या वतीने सकस आहार म्हणून ५०० गावठी अंडी देण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके,नावळे माजी सरपंच संभाजी रावराणे,माजी जि. प.सभापती संदेश सावंत – पटेल,बंडू सावंत,उपळे माजी सरपंच देवानंद पालांडे, स्वप्नील धुरी,सत्यवान सुतार,सांगूळवाडी माजी सरपंच सुतार,तहसीलदार रामदास झळके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार,डॉ. मंदार पाटोळे,नायब तहसीलदार ए.के.नाईक,मंडळ अधिकारी पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी डॉ. अनिल पवार म्हणाले,तालुक्यात गेले दोन दिवसात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्या निम्याने कमी झाला आहे.दिगशी गावात सुमारे १०० रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले होते.सध्या ५० % रुग्ण बरे झाले आहेत.
तहसीलदार रामदास झळके म्हणाले,तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे.महसूल विभाग,आरोग्य विभाग,पोलीस विभाग समन्वय साधून काम करत आहेत.
फोटो:सांगूळवाडी येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना गावठी अंडी देतांना सतीश सावंत व अन्य.

