◾कोविडमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळावे ; आमदार शेखर निकम यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-२० :- कोवीड कालावधीमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम सर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली .मागील वर्षी कोवीड कालावधीमध्ये काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना विमा संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण लागू केले होते. परंतु सदर विमा संरक्षणाची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच लागू असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस संदीप जालगावकर आणि सदस्य, सतीश सावर्डेकर यांनी आमदार शेखर निकम साहेब यांच्या लक्षात आणून दिले .
करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागत असताना आरोग्य कर्मचारी, पोलिस, शिक्षक, तसेच इतर सरकारी कर्मचारी यंत्रणा यांना सदर विमा सुरक्षा पुन्हा लागू व्हावे, त्या पत्रास मुदतवाढ मिळावी यासाठी मा. मुख्यमंत्री महोदय तसेच मा. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार शेखर निकम यांनी पत्राद्वारे सदर विमा संरक्षणाला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली .त्याबरोबरच या चार महिन्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील साहाय्य मिळावे अशी शिफारस केलेली आहे
मा.मुख्यमंत्री यांनी सदर पत्राची दखल घेत वित्त विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठवलेले असल्याचे ईमेल द्वारे कळविले.
सदर विषयामुळे सरकारी कर्मचारी यांना दिलासा मिळाला आहे.प्राथमिक शिक्षक संघ सरचिटणीस संदीप जालगावकर यांनी आमदार निकम सर यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले आहेत.

