आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

◾वैभववाडी येथील लमानी कामगाराचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-२० :- येथील बाजारपेठेत लमानी कामगाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी घडली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. वाचाप्पा हरिप्पा चव्हाण वय 50 राहणार कोयळतांडा, कर्नाटक असे मयत कामगाराचे नाव आहे.

तो कामगार कामानिमित्त वैभववाडी बाजारपेठेत आला होता. येथील एका खाजगी दवाखान्यासमोर त्याला अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत लमानी कामगार एका मुकादमाकडे काम करत होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेला. शवविच्छेदन करून पोलिसांनी तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू जामसंडेकर, मारुती साखरे, एस टी शिंदे, अभिजीत मोरे, मारुती सोनटक्के आदी उपस्थित होते. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!