◾चिपळूणच्या महा रक्तदान शिबिरात युवा नेते अनिरुद्ध निकम यांनी केले रक्तदान..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-२१ :- देशासह महाराष्ट्रवर कोरोना सारखे महासंकट आलेले असताना सगळीकडे रक्ताचा तुटवडा भासत आहे, आणि त्यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या प्रेरणेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अन्य संलग्न संस्था यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर संपन्न होत आहेत.
सोमवार दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी अपरांत हॉस्पिटल चिपळूण येथे संपन्न झालेल्या महा रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी या लढ्यात सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी पर्यायाने देशासाठी रक्तदान केले पाहिजे या भावनेतून युवा नेते अनिरुद्ध शेखर निकम यांनी रक्तदान करून तरुणांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या स्तुत्य राष्ट्रीय उपक्रमासाठी रक्तदाना वेळी उपस्थित असणारे चिपळूण नगरपालिकेचे माजी गटनेते राजेश कदम , माजी नगरसेवक रमेश खळे, रोटरीचे अध्यक्ष प्रशांत देवळेकर, सिद्धेश लाड, मनोज जाधव, अमोल टाकळे, सचिन साडविलकर, मल्लेश लकेश्री, शिक्षक संघटनेचे रोहित जाधव, प्रकाश गांधी, तसेच विश्वनाथ कांबळी, अमित सुर्वे, रुपेश इंगवले, अमित जाधव, जितेंद्र फुटक, भावेश उतेकर तसेच चिपळूण मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व मान्यवर मंडळींसह युवक राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून अनिरुद्धचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. रक्तदान शिबिरासाठी उपस्थित असलेल्या अनिरुद्ध निकम यांचा आयोजकांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

