◼️श्रीमती मालतीबाई मोरे यांचे दु:खद निधन
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२० :- गुहागर तालुक्यातील मु. पिंपर गावच्या जुन्या जमान्यातील एक समाजसेविका श्रीमती मालतीबाई शाहुराव मोरे यांचे काल मु. ठाणे येथील आपल्या निवासस्थानी अल्पशा ( कोविड ) आजाराने दु:खद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय सुमारे ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एस.टी.कामगार संघटना, ठाणे विभागाचे अध्यक्ष श्री.मुकुंद मोरे यांच्या सह चार पूत्र, दोन कन्या, नातवंडे, असा मोठा सुशिक्षित कुटुंब परिवार आहे,
विशेष म्हणजे कै. मालती वहिनींचे पती कै. शाहूराव मोरे हे सैन्य दलात असताना नेहमीच सरहद्दीवर राहून देश रक्षणाची सेवा बजावत होते.तर मालतीताई या तेव्हाच्या सरकारने , सत्तेचे विकेंद्रीकरण करून तळागाळातील लोकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून पंचायत राज्याची संकल्पना मांडली तेव्हा मु.पिंपर गावातील प्रथम ग्रामपंचायत स्थापनेत पहिल्या महिला पंचायत सदस्यपदी नियुक्त झाल्या होत्या. त्या १९५८ पासून १९६२, संस्थापक सरपंच कै. त्रिंबक आत्माराम ( गोविंददादा) मोरे यांच्या निधनापर्यंत ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्याकाळी बहुजन समाजातील महिला सहसा सार्वजनिक ठिकाणी सहभाग घेत नसत, त्यामुळे मालतीबाईंच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असे. त्यावेळचे संयुक्त महाराष्ट्र समितीचे खासदार प्रेमजी भाई आसर, गुहागरचे आमदार श्री. दत्तात्रय यशवंत विलणकर यांनी पिंपरला येऊन त्यांचे कौतुक भरे अभिनंदन केले होते. त्यांच्या अकाली निधनाचे वृत्त कळताच परिचितांत हळहळ व्यक्त होत आहे.