◾करूळ घाटात धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अंडी वाहतूक करणारा आयशर टेम्पो तब्बल तीनशे फुट दरीत कोसळला..
◾अपघातात एक जण जागीच ठार..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-२० :- करूळ घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अंडी वाहतूक करणारा आयशर टेम्पो तब्बल तीनशे फुट दरीत कोसळला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव टिमसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच करुळ सह्याद्री जीवरक्षक टीमही मदतीसाठी घाटात दाखल झाली आहे.
अंडी भरलेला टेम्पो कोल्हापूरहून कणकवलीकडे जात होता. करूळ घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. आणि टेम्पो खोल दरीत कोसळला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. तर टेम्पोचा पूर्णता चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रविण देसाई, पोलीस कर्मचारी श्री तळेकर, श्री. राठोड, संदीप राठोड, गणेश भोवड, ओमकार गोगटे, डॉ. धर्मे दाखल झाले आहेत.
तसेच सह्याद्री रक्षक प्रमुख हेमंत पाटील यांच्यासह राजेंद्र वारंग, आनंद शिंदे, अमर शिंदे, संजय पवार, देवेंद्र पवार, सुधीर पवार, गंगाराम पवार, सुनील शिंदे, आनंद माळकर, रवींद्र सावंत, विजय पवार, तुकाराम पवार आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मयत चालकाला दरीतून वर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.