◾चिंता इन्सुली गावाच्या भवितव्याची…. चिंता इन्सुली गावाच्या तिलारी कालव्याची ; सामाजिक कार्यकर्ते विकी केरकर
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴बांदा,दि-२० :- आज गेला महिनाभर कालव्याच्या संबंधी जो काही घटनाक्रम इन्सूली गावात सुरू आहे हा फारच चिंताजनक आणि जागरूक जनतेला मानसिक त्रास देणाराच आहे.
खरंतर गेली कित्येक वर्षे या कालव्यांचे काम अत्यंत कूर्म गतीने सुरू आहे.पाणी ही प्राथमिक गरज आहे आणि कालव्यात लवकरात लवकर पाणी आलंच पहिजे यासाठी गावपातळीवर मोठा लढा उभारणं नितांत गरजेचे आहे.सर्वांनाच वाटतं कि नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही,आणि ते पाईप लाइन चे काम थांबविल्या नंतर काही दिवस आदरयूक्त भीतीपोटी संबंधित मक्तेदाराने ते बंद सुद्धा ठेवलं इथपर्यंत ठीक आहे,असं गावातील शेतकऱ्यांचे मत आहे.
पण मुख्य कालवा आणि पाईप लाइन या दोन्ही कामांचा परस्परांतील काहीही संबंध नसताना मुख्य कालव्याची संबंधित यंत्रणा कालव्यात पाणी सोडत नाही म्हणून गावात सुरू असलेले पाईप लाईन चे काम एवढे दिवस रोखून ठेवणे केव्हाही संयुक्तिक नसून ते संपूर्ण गावच्या हिता विरुद्ध असल्याची संपूर्ण गावात चर्चा आहे.
काय करावं म्हणजे हा गुंता सुटेल ……
गाव हितासाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थ या निर्णयाला एकवेळ सहकार्य सुद्धा करतील ……!!!
पण हे गावात सुरू असलेले कोट्यवधी रुपयांचे पाईप लाइनचे काम गावच्या विरोधामुळे समजा रद्द झाले तर ते पुन्हा रि-टेंडर करून कोण आणणार व किती वर्षांनी आणणार याची कोणीतरी ठोस जबाबदारी स्विकारली पहिजे, नाहीतर असं व्हायला नको कि अंतिम टप्प्यात काम सुरू असलेल्या कालव्याचे पाणी सुरू व्हायचे आणि इन्सूलीवासियांनी ते गावच्या मध्यभागतून वाहताना फक्त बघ्यांसारखे बघायचे अशीच चर्चा सर्वत्र रंगलेली आहे .
खरे पाहता या संपूर्ण घटनाक्रमास गावचे प्रशासन अर्थातच ग्रामपंचायत कार्यालय आणि सरपंच पूर्णतः जबाबदार आहेत.
प्रशासकीय पातळी वरून ठोस निर्णय झाला असता तर आज गावात अशी दुफळी निर्माण होऊन गावातील जनतेची अशी सम्भ्रमावस्था झालीच नसती.वेळ गेलेली नाही प्रशासनाने अजून तरी शुद्धीवर येऊन या बाबतची त्यांची कायदेशीर जबाबदारी व भूमिका काय आहे हे गांवासमक्ष स्पष्ट करावे,अन्यथा आम्हा सर्व शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना आपल्या प्रशासनाच्या विरोधात कंबर बांधून उभे राहण्याची वेळ येईल .
……विकी केरकर
सामजिक कार्यकर्ता इन्सूली .

