आरोग्यसामाजिकसिंधुदुर्ग

पडवे येथील खा,नारायण राणे यांचे मेडिकल कॉलेज रुग्णांसाठी आशेचे किरण

*राजकारण गेलं चुलीत आपला जीव महत्त्वाचा*

*नागरिक हो राजकारणाचा विचार न करता आपला अमूल्य जिव वाचविण्याचा प्रयत्न करा*

भारतात देशात कोरोणाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडविला आहे, महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढल्याचे दिसत आहे, मात्र इतर राज्यातील आकडेवारी सत्य, पुर्णपणे दाखविली जात नाही, यामागे काही तरी वेगळी राजकीय कारणे असतील मात्र महाराष्ट्रातील राजकारण अतिशय गडद होत चालले आहे हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे
कोरोना या विषाणूमुळे अनेकजण मृत्युमुखी पडत असताना इथे मात्र कोण कसे अडचणीत येईल याचाच जास्त विचार केला जातो आपण मंदिरा साठी भांडतो, करोडो रुपयाची मंदिरे उभी करतो, पण महाराष्ट्रात करोडो ज्ञरुपये खर्चून रुग्णालय उभे करू शकलो नाही, किंवा लाखो रुपये खर्च करून डॉक्टर होता आले नाही, किंवा मोफत वैद्यकीय शिक्षणासाठी कोणी लढा उभारलेला दिसत नाही, मात्र मंदिरांसाठी लढा उभा राहिलेला आपण अनेकांनी पाहिला, इथे जीव महत्त्वाचा आहे देव नाही, देवाने प्रत्येकाला सांगितले तुम्ही तुमचे कर्म करा, मी फळ देणार आहे, आपण कर्म विसरलो त्यामुळे सध्याची ही परिस्थिती ओढवलेली आहे.
मित्रहो राजकारण काही असो प्रत्येकाला आपला जीव महत्त्वाचा आहे तो जीव वाचविण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. त्यामुळे नकारात्मक बातम्या पहात न बसता सकारात्मक ऊर्जा शरीरात कशी निर्माण होईल याचा विचार करून शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करून जनसंपर्क कटाक्षाने टाळावा, तुम्हाला कालचेच एक उदाहरण देतो ,काल रात्री मला अकरा वाजता माझ्या वाड्यातील मंडळाच्या कार्यकर्त्याचा फोन आला,त्याच्या एका नातेवाईकाला श्र्वसनाचा त्रास होऊ लागला सावंतवाडी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांना गोवा बांबोळी येथे पाठविले तेथे त्यांची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली ती निगेटिव्ह आली,मात्र रुग्णालयात जागा नसल्याने त्यांना दाखल करून घेतले नाही, श्र्वसनाचा त्रास असलेला तो रुग्ण तीन तास बाहेर बसून होता,रात्रो बारा वाजता मंगेश तळवणेकर,देवा सुर्याजी,यांना फोन केला , जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन पाटील यांना फोन केला त्मांनीही नम्रपणे काॅट शिल्लक नसल्याचे सांगितले,व दुसरी कडे प्रयत्न करा असा सल्लाही दिला,मी खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेज चे प्रमुख डॉ आर एस कुलकर्णी यांना फोन केला त्यांनी गावडे साहेब चिंता करु नका आमच्या कडे कोरोना रुग्ण दाखल आहेत,काॅटही कमी आहेत शिवाय तुमच्या पेशंटची टेस्ट निगेटिव्ह आहे वय जास्त आहे,तरीही पाठवून द्या दाखल करुन उपचार सुरू करूया असा धीर दिला.. म्हणून आपले हक्काचे रुग्णालय हवे.ते राणे कुटुंबियांचे आहे म्हणून तिरस्कार न करता संकट काळी ते आपला आधार आहे हे विसरून चालणार नाही..इतर खासगी रुग्णालयात पहिले पैसे भरुन घेणार मग उपचार सुरू होणार,मात्र या रुग्णालयात पहिले उपचार करतात मग बिलाचे बघतात, असा अनुभव मनोज सावंत यांचा मुलगा दुसऱ्या मजल्यावरून पडून बरगड्या तूटून कोमात गेला त्यावेळी सावंत यांना आला.व आज तो मुलगा बरा आहे.तर महत्वाचा मुद्दा तो निवृत्त माजी सैनिक रुग्ण व त्यांच्यासाठी माझी चाललेली ती धडपड,अखेर त्या रुग्णाला गोवा बांबोळी रुग्णालयातच दाखल करून घेतले व मी दोन वाजता निवांत झोपलो.
सकाळी उठल्यावर माझा मुंबईतील मीत्र चंदन याची बायको कांचन कोरोनाने गेली अशी मनाला न पटणारी बातमी मिळाली, वयाच्या अवघ्या ४३व्या वर्षी ती आपल्या चौदा व बारा वर्षांच्या मुलांना सोडून गेली,ती दोन्ही मुले कोरोना पॉझिटिव्ह, मीत्राची आई कोरोना पॉझिटिव्ह तीचे दुसरीकडे खासगी रुग्णालयात उपचार सुरू.. तर माझा मीत्र सुरवातीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी धडपड केली कशीबशी खासगी रुग्णालयात उपचारासाठी बायकोला दाखल केली पण प्रयत्न व्यर्थ ठरलेत.एकीकडे आईची ऑक्सिजन लेवल खाली वर तर दुसरीकडे कोरोना बाधीत दोन लहान मुले घरी असे चित्र मन हेलावून टाकणारे.. म्हणून मित्रहो तूम्हाला हात जोडून विनंती करतो राजकारण काहीही असो तूम्ही तूमच्या जिवाची काळजी घ्या उगाच कारणा शिवाय घरा बाहेर पडू नका आणि कुठे आहे कोरोना म्हणून थट्टा मस्करी तर मुळीच करु नका,कारन तूम्ही जर बेफीकीर वागलात तर तो कधीही होऊ शकतो, आपल्या रुग्णालयात काॅटही शिल्लक नाही अशी भयावह परिस्थिती आहे,त्यामुळे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करुया,गेलेला जीव परत आणून देऊ शकत नाही म्हणून आरोग्याच्या बाबतीत राजकारण न करता प्रत्येकाने आपल्या जिविताची काळजी घेणे गरजेचे आहे, तरी सार्वजनिक ठिकाणी मास चा वापर करावा, घरात आल्यावर हात पाय स्वच्छ धुवावेत, महत्वाच्या कामाशिवाय घरा बाहेर पडू नका,व आपल्या देशातून कोरोनाला हद्दपार करावे असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे..असे म्हटले जाते सावध तो सुखी‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!