सिद्धिविनायक हॉस्पिटल तर्फे सर्व सुविधायुक्त कोविड सेंटर चिपळूण वासीयांच्या सेवेत रुजू..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०४: शहरातील मार्कंडी येथील डॉ. पुजारी यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे मुंबई गोवा महामार्गावरील अभिरुची हॉटेलच्या बिल्डिंग मध्ये सर्वसुविधायुक्त शासनमान्य कोविड सेंटर १ ऑक्टोबर पासून चिपळूण वासियांच्या सेवेत रुजू झाले आहे.
यामुळे शहर तसेच ग्रामीण भाग आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणांहून येणाऱ्या कोविड रुग्णांसाठी हे एक वरदान ठरणार आहे. सध्या कोविडच्या भीतीने सर्वच त्रस्त असताना या सेंटरच्या उपलब्धतेमुळे बऱ्याचअंशी रुग्णांना दिलासा मिळणार आहे. डॉ. विशाल पुजारी आणि डॉ. डिंपल पुजारी यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलला सारी या आजाराचे केंद्र म्हणून शासन मान्यता मिळाल्याने त्याठिकाणी तत्सम आजार आणि इतर आजारांवर उपचार केले जाणार आहेत.
याठिकाणी कोरोना कालावधी सुरू झाल्यापासून पुजारी दांपत्य आपले हॉस्पिटल कधीही बंद न ठेवता सातत्याने रुग्णांना सेवा देतानाच धीर देत असल्याचे पण दिसून आले होते. यामुळे अनेकांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी करावी लागणारी धावपळीपासून मुक्तता मिळाली होती.अगदी अतिदक्षता प्रकारातील रुग्ण दाखल करून घेऊन वैद्यकीय सेवेतील ब्रीदवाक्य जपण्याचा शक्य तेवढा प्रयत्न देखील या दाम्पत्याने केलेला दिसून आला आहे.
या कोविड सेंटरमध्ये सुसज्ज आयसीयू, मोबाइल एक्स-रे मशीन, सशुल्क आरटीसाठी सुविधा, पीसीआर स्वाब चाचणी, ऑक्सिजन, एनआयव्ही व्हेंटीलेटर आणि एचएफएनओ थेरपी, मानसशास्त्रीय समुपदेशन ,रुग्णवाहिका सेवा, डाएटिशियन सल्लामसलत , सीटी स्कॅन सेवा, आरोग्यविषयक पौष्टिक अन्न, प्रयोगशाळा, फार्मसी सुविधा, प्रशस्त पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. तसेच चोवीस तास सेवेसाठी 7768054737 हा नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन हॉस्पिटल व्यवस्थापन तर्फे करण्यात आले आहे.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

